फास्टॅग म्हणजे काय ?

WHAT IS FASTAG IN MARATHI

तुम्ही नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला टोल भरायचा असेल तर मग 1 डिसेंबर 2019 पासून तुमच्याकडे ‘फास्टॅग’ असणं गरजेचं आहे.

राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशभरात १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय. यापर्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील देशभरातल्या सर्व ५३७ टोल नाक्यांवर तसंच महामार्गांलगत असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये हा फास्टॅग मोफत देण्याची प्राधिकरणाची योजना आहे. यासोबतच ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या कार्यालयांमध्येही हे फास्टॅग मोफत देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत फास्टॅगसाठी नागरिकांना केवायसी भरण्याची आवश्यता नाही. हे फास्टॅग ट्रक, कार, जीपसह सर्व वाहनांसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत देण्यात येतील. पण बँका आणि संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या फास्टॅगसाठी केवायसी भरावा लागणार आहे.

फास्टटॅग काय आहे ?

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी – RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं.

रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल.सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो. पण नवीन नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.

टोलनाक्यांवर लोकांची अडचण होऊ नये, म्हणून सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचं ठरवलंय. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. या लेनला ‘हायब्रिड लेन’ असं म्हटलं जाईल.

फास्टॅगमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल. गाड्या न थांबता टोल नाका पार करतील. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गाड्या खोळंबून राहिल्याने होणाऱ्या धुराचं प्रमाण कमी झाल्याने प्रदूषणही काहीसं कमी होईल.

याशिवाय सरकारकडे फास्टटॅगमुळे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल. म्हणजे गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणंही यामुळे सोपं होईल.

शिवाय वाहन चालकांनाही सोबत सुट्टे पैसे वा रोख रक्कम जवळ बाळगावे लागणार नाहीत.

याशिवाय वाहनाने प्रवास करणाऱ्यांना खर्चाचा आढावा घेणं सोपं जाईल. कारण टोल डिजीटल पद्धतीने भरल्याने त्याचा तपशील ‘अकाऊंट स्टेटमेंट’मध्ये मिळेल

कुठे मिळेल Fastag ?

>राज्यातील आरटीओ कार्यालयांत
>शॉपिंग साइटवरून ऑनलाइन खरेदी करता येणार
>माय फास्टॅग App (MYFASTag Marathi App)वरून फास्टॅग कुठे मिळेल याची माहिती घेता येते.
>Application फास्टॅग ऑनलाइन रिचार्जही करता येतो.
>देशात २८, ३७६ केंद्रांद्वारे फास्टॅगची विक्री करण्यात येतेय.
>२३ बँकांना फास्टॅग सुविधेशी जोडण्यात आलंय.

लोकांना सहजपणे फास्टॅग विकत घेता यावा, यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.

बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत 28,500 विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत.

यासोबतच आरटीओ (RTO) कार्यालय, सर्व सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग उपलब्ध आहेत.

1 डिसेंबर पर्यंत लोकांना फास्टॅग मोफत देण्यात यावेत अशा सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. या फास्टॅगसाठीचे 150 रुपये 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरेल.

कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे AMAZON, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, AXIX बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील.

तुमच्या जवळचं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी Android फोनवर My FASTag App डाऊनलोड करता येईल.यासाठी ही WWW.FASTAG.ORG/APPLY-ONLINE वेबसाईटही तयार करण्यात आली असून इथे जाऊनही तुम्ही फास्टॅग अर्ज करू शकता. या योजनेशी संलग्न असणाऱ्या सगळ्या बँकांची नावंही यात आहेत. इथे तुम्ही फास्टॅग रिचार्जही करू शकता.

टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा

> राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगची माहिती पुरवण्यासाठी (NHAI) १०३३ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.
> या क्रमांकावर फास्टॅगसंबंधी तक्रारही दाखल करता येणार आहे.
> ८ ते १४ नोव्हेंबपरदरम्यान या टोल फ्री क्रमांकावर ५६५३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ५३०१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

अधिक माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या 1033 या हेल्पलाईनवर फोन करता येईल.

इतर कोणत्याही प्री-पेड कार्डप्रमाणेच हा फास्टॅगही रिचार्ज करता येईल. UPI द्वारे किंवा मग नेटबँकिंग, क्रेडिट वा डेबिट कार्डच्या मदतीने फास्टटॅग रिचार्ज करता येईल.

रु. 100 ते 1 लाखांपर्यंतचा रिचार्ज करता येणं शक्य आहे.

फास्टटॅग लावला नाही तर… ?

जर फास्टॅगशिवाय एखादी गाडी टोलनाक्यावर आली तर त्या प्रकारच्या वाहनासाठी लागू असणाऱ्या टोलच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल असं सरकारच्या अधिसूचनेत म्हटलंय.

Fastag साठी कोणती कागदपत्रं लागतील ?

फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC, गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझचा फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागेल.

सोबतच कागदपत्रांवरील रहिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून (Address Proof) आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी दाखवावं लागेल.

जर तुमच्याकडे दोन गाड्या असतील, तर तुम्हाला दोन्ही वाहनांसाठी वेगवेगळे फास्टटॅग घ्यावे लागतील.

एक फास्टॅग 5 वर्षं वैध असेल.

याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही टोलनाक्यापासून 10 किलोमीटरच्या परिघात रहात असाल तर तुम्हाला टोलमध्ये सूट मिळेल.

कॅश बॅकच्या स्वरूपात ही सूट तुमच्या खात्यात जमा होईल.

तुम्हाला डिजिटल मार्केटींगची आशादायक कारकीर्द हवी आहे का ? आमच्या डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्समध्ये सामील व्हा ( 500+ पानांचा कोर्स मराठीमध्ये ) आणि असंख्य संधींचा मार्ग मोकळा करा. SIGNUP NOW

तुम्हाला हि माहिती उपयुक्त वाटली असेल अशी आम्ही आशा करतो  ! !
आपल्याला काही प्रश्न असल्यास खाली टिप्पणी अगदी  मोकळ्या मनाने करा .

कृपया खालील LIKE बटण दाबा. आणि आपल्या मित्रांना  SHARE करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected by COPYSCAPE!!
×

नमस्कार !

आपले काही प्रश्न किंवा शंका असेल तर आमच्याशी Whats's App वर संपर्क करा अथवा खालील पत्यावर ई-मेल करा.
Digitaltree.info@gmail.com

×
%d bloggers like this: